शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संजय मंडलिकांना खासदार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 00:50 IST

मुरगूड : काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधात लढलो असलो, तरी विकासासाठी राजकीय वैर विसरून आम्ही एकत्र आलो आहोत. स्वर्गीय मंडलिक यांच्या इच्छेनुसार आता संघर्ष मिटवायचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुरगूडची खासदारकीची खंडित झालेली परंपरा आपण पुन्हा सुरू करूया. कागलमध्ये मी, मंडलिक आणि प्रवीण पाटील एकत्र आलो तर जे मताधिक्य मिळेल, ...

मुरगूड : काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये विरोधात लढलो असलो, तरी विकासासाठी राजकीय वैर विसरून आम्ही एकत्र आलो आहोत. स्वर्गीय मंडलिक यांच्या इच्छेनुसार आता संघर्ष मिटवायचा निर्णय आम्ही घेतला आहे. मुरगूडची खासदारकीची खंडित झालेली परंपरा आपण पुन्हा सुरू करूया. कागलमध्ये मी, मंडलिक आणि प्रवीण पाटील एकत्र आलो तर जे मताधिक्य मिळेल, ते फेडायला विरोधकांना सात जन्म घ्यावे लागतील. संजय मंडलिकांसाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जिवाचे रान करतील, असे आश्वासन माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी दिले.मुरगूड (ता. कागल) येथे नगरपरिषदेच्या वतीने आयोजित विकासकामांच्या प्रारंभानंतर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजय मंडलिक होते. प्रारंभी हुतात्मा तुकाराम वाचनालयाच्या समोरील चौक सुशोभीकरण प्रारंभ आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, तर विजया उद्यान विकसित करणे कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते, तसेच शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राचे अनावरण प्रवीणसिंह पाटील यांच्या हस्ते पार पडले. विविध रस्त्यांचे उद्घाटन वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते पार पडले.यावेळी मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस हे चांगले मित्र आहेत. त्यामुळे कागलसाठी २० कोटींचा निधी आणला. आता मुरगूड शहराला देशात टॉपवर नेण्यासाठी आपण वाट्टेल ती मदत करणार आहोत. विकासकामांसाठी आपण संजय मंडलिक, सतेज पाटील व प्रवीणसिंह पाटील एकत्रित प्रयत्न करणार आहोत. मी मंडलिकांचे नेतृत्व मान्य केले होते. त्यांनी दिलेल्या नेतृत्व गुणांवरच आपण कार्यरत राहणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.माजी मंत्री व आमदार सतेज पाटील म्हणाले की, कार्यक्रमाला येताना मी आणि मुश्रीफ प्रवीणसिंह पाटील यांना सोबत घेऊन आलो आहोत. बदलत्या राजकारणाच्या समीकरणामुळे आपला शत्रू निश्चित करण्याची भूमिका या व्यासपीठाने दिली आहे. २०१४ च्या निवडणुकीत परिस्थिती वेगळी होती. यामध्ये मुश्रीफ यांनी आपल्याला गळ घातली होती, तर पक्षांचीही काही बंधने होती; पण आता त्याची चिंता कागलकरांना करायची गरज नाही. सदाशिवराव मंडलिक यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला आणि मुश्रीफ यांना श्री गणेश शक्ती देईल. संजय मंडलिक हेच लोकसभेचे उमेदवार असतील याकडे लक्ष केंद्रित केले.यावेळी प्रा. संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा बँकेच्या राजकारणामध्ये मंडलिक, मुश्रीफ दूर झालेत; पण आज त्याच बँकेच्या कार्यक्रमामुळे मंडलिक, मुश्रीफ गट परत एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली. स्वर्गीय मंडलिक हे विकासकामांमध्ये राजकारण आणत नव्हते. आज याच विचाराने दूर गेलेले मुश्रीफ, प्रवीणसिंह या व्यासपीठावर आहेत त्यामुळे आपण धन्य झालो.यावेळी माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनीही विकासमकामांत राजकारण न आणता आपण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. वीरेंद्र मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले यांनी स्वागत केले, प्रास्ताविक नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले. यावेळी युवराज पाटील, नामदेव मेंडके, धनाजी गोधडे, शिवाजीराव चौगले, मुख्याधिकारी संजय गायकवाड, दीपक शिंदे, शामराव पाटील-यमगेकर, संदीप कलकुटकी, रवी परीट, प्रतिभा सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, सुप्रिया भाट, अनुराधा राऊत, रंजना मंडलिक, हेमलता लोकरे, रूपाली सनगर, वर्षाराणी मेंडके, संगीता चौगले, आदी उपस्थित होते.तलावावरील हक्क सोडणार नाहीमुरगूड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी आम्ही २० कोटी रुपयांची नवी योजना कार्यान्वित करणार आहोत, पण सर पिराजीराव तलावावर असणारा हक्क सोडणार नाही. समरजित घाटगे यांनी या तलावाच्या वरील बाजूला शेती जरूर करावी; पण यामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करावा, कारण त्यामुळे पाणी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, असे प्रा. संजय मंडलिक यांनी सांगितले.

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूर